Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे 350 विद्यार्थिनींना मोफत सॅनेटरी नॅपकिन वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालय व सुदुंबरे येथील संत तुकाराम विद्यालय (Talegaon Dabhade) यामधील इयत्ता आठवी ते दहावी मधील 350 विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. यावेळी मुलींच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

उपक्रमात विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना वैयक्तिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचाराच्या पद्धती, मुलींच्या अडचणी व समस्या इत्यादी विषयी रो. डॉ. धनश्री काळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना मुलींना अभ्यास व आरोग्य याचे महत्त्व विशद केले. विद्यार्थी दशेत स्वयंशिस्त व स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व विशद करताना ज्येष्ठ रोटेरियन हरिश्चंद्र गडसिंग यांनी शालेय कामकाजाचे व रोटरी सिटीच्या कामाचे कौतुक केले.

Pimpri : 89 व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा, अध्ययनाच्या नवनवीन पद्धती,आधुनिक तंत्रज्ञान इत्यादीचा स्वीकार करून आपली वैयक्तिक गुणवत्ता वाढवावी असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी करताना शिष्यवृत्ती व NMMS परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे जाहीर केले.

मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक गणपत कायगुडे व संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक सय्यद यांनी केले. प्रास्ताविक सचिव भगवान शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन युवराज सोनकांबळे यांनी केले. आभार प्रकल्प प्रमुख अँन्स शालिनी राजेंद्र कडलग व सह प्रकल्प प्रमुख संगीता शिरसाट यांनी मानले.

रो.राजेंद्र कडलग,रो. सुनंदा वाघमारे,रो.रघुनाथ कश्यप, रो.रामनाथ कलावडे,रो.मधुकर गुरव,रो.दशरथ ढमढेरे,रो.तानाजी मराठे,रो.संतोष मोईकर,रो. संजय चव्हाण इत्यादी रोटरी मेंबर्स व दोन्ही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम (Talegaon Dabhade) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.