Akurdi : साईराज पारखी, वेदांत  बाबर यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट्स फौंडेशन मधील साईराज नवनाथ पारखी व वेदांत वसंत बाबर (Akurdi) यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झाली आहे. अनुष्का बाबर हिला युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.

Pimpri : 89 व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा 2023’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन

नॅशनल रायफल असोसिएशन दिल्ली  आयोजित पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा  ही कोलकता येथील असनसोल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यातून विविध गटातील हजारो पिस्तुल व रायफल नेमबाजांनी सहभाग नोंदवला होता.

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट फौंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील  साईराज पारखी सब युथ गटात 400 पैकी  347 व वेदांत  बाबर यांनी सब यूथ गटात 400 पैकी 349 गुण मिळवत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केले आहे.  यामुळे पिंपरी-चिंचवडचे नाव नेमबाजी मध्ये आता सतत पुढे येत आहे.

खडकी येथे काल झालेल्या युनिव्हर्सिटी स्पर्धेत अनुष्का बाबर हिने 10 मीटर पिस्तुल प्रकारात 400 पैकी 373 गुण मिळवत सुवर्णपदकची कमाई केली.  या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. खेळाडू हे अरुण पाडुळे स्पोर्ट फाऊंडेशनचे प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

आतापर्यंत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 25 राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पाडुळे  स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून पिंपरी-चिंचवड मधून नेमाबाजीत जास्तीत जास्त खेळाडू हे  सहभागी होऊन राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडचर नेमाबाजीत नाव मोठे करण्यासाठी (Akurdi) प्रयत्न करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.