Pimpri: लोहगडावर रुद्राभिषेक सोहळा

एमपीसी न्यूज – किल्ले लोहगड येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदीर येथे विश्व हिंदु परिषद,  संदिप वाघेरे युवा मंच व बजरंग दल पुणे जिल्हा यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते.

हा रुद्राभिषेक सोहळा नगरसेवक संदिप वाघेरे  यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाला 500 ते 600 भाविक उपस्थित होते.

संदिप वाघेरे युवा मंचाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले होते.  यावेळी संजय गायके, राजेंद्र वाघेरे, योगेश वाघेरे, हरिष वाघेरे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, संदेश भेगडे, कुणाल साठे उपस्थित होते. तसेच लोहगड घेरेवाडी येथील ग्रामस्थांनीही या रुद्राभिषेक सोहळ्यात आपला सहभाग दर्शवला.

डॉ. प्रमोद बोराडे आणि  जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.