Akurdi : लायन्स क्लब पुणे आकुर्डी सफायरतर्फे जागतिक महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब पुणे आकुर्डी सफायरतर्फे गुरुवारी (दि. 7) आकुर्डीच्या सिजन्स बॅन्क्वेटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला लायन्स क्लब पुणे आकुर्डी सफायरचे अध्यक्ष दीपक गावंदरे तसेच क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी लाईफ कोच विनय सातपुते यांचे हॅप्पीनेस मंत्रा फाॅर हॅप्पीनेस ईंडेक्स या विषयावर व्याख्यान झाले. जगातील सर्वात लहान लेखिका ओवी सातपुते हिने आपल्या पुस्तकाच्या विक्रीतून आलेली रक्कम दोन गरजु मुलींच्या शाळेच्या फीसाठी देणगी म्हणून दिली. त्याचप्रमाणे नव निर्वाचीत विभागीय अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी व विजय अगरवाल यांच्यातर्फे निर्वाचीत प्रांतपाल MJF लायन ओमप्रकाश पेठे व श्रध्दा पेठे तसेच प्रांत सचिव शशी कदम व प्रवक्ता सुनील जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी क्लबतर्फे उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शोभा कदम व तेजस्विनी सवाई यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ म्हत्रे, राजकुमार राऊत, शिरीष हिवाळे, रवी सातपुते, विपुल म्हत्रे, आनंद कुलकर्णी, प्रवीण थोरात यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.