Pimpri : कारखान्याला भेट देऊन ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले औद्योगिक जग

एमपीसी न्यूज – भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान (Pimpri ) अवगत होण्यासाठी ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकासासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यानुसार शनिवारी (दि.21) ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्रिमूर्ती इंडस्ट्री येथे भेट दिली.

विद्यार्थ्यासमवेत शाळेच्या वतीने स्वप्न अगवेकर, पूनम शेलकर शेलकर, उषा एवी, प्रणिता गिरी व वैशाली उपस्थित होत्या.

त्रिमूर्ती इंडस्ट्रियल समूह हा इंद्रायणी नगर परिसरात स्थित आहे. हा उद्योग समूह शेळके दांपत्य अतिशय कुशलरीत्या 25 वर्षांपासून चालवत आहे. कारखान्याच्या आवारात शिरल्यानंतर तिथल्या पायाभूत सुविधा मशिनरी ची मांडणी अतिशय सुबकरीत्या होती. यंत्रांचे वर्गीकरण त्यांच्या क्षमतेनुसार करण्यात आले होते.

Talegaon Dabhade : इंद्रायणी डी. फार्मसी महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

सर्वात प्रथम लायन्स क्लबचे अशोक येवले सरांनी त्रिमूर्ती इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा शेळके (Pimpri ) सरांची ओळख करून देण्यात आली. या कारखान्यात प्रामुख्याने औषधांचे पॅकेजिंग, दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहनांचे महत्वाचे घटक महत्त्वाचे घटक व त्याचे आवरण आणि आणि नऊ दलात वापरले जाणारे पेरिस्कोप आवरण तयार केले जाते.

या उद्योग समूहात स्वयंचलित स्वयंचलित आणि पारंपरिक पद्धतीचे अशा यंत्र बसवले आहे. उत्पादन निर्मितीत लागणारे वेगवेगळे टप्पे मिलिंग, ड्रिलिंग, पॅकेजिंग आणि कुलंट यांच्या वापराचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवण्यात आले.

संबंधित सर्व कार्य कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर अमोल जाधव यांनी केले तसेच मुलांच्या शंकेचे निरसन केले केले. डिझाईनिंग विभागाचे मुख्य अभिजीत यांनी मुलांना दिलेल्या वस्तूचे थ्रीडी परिमाणे काढण्यास (Pimpri ) शिकवले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.