PCMC : औद्योगिक सांडपाण्याची माहिती न देणा-या उद्योजकांवर कारवाई;  महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे उगमापासून( PCMC) संगमापर्यंत औद्योगिक कारणांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने  पाऊले उचलली आहेत.  औद्योगिक कारखान्यामधून निर्माण होणाऱ्या  सांडपाण्याबाबतची माहिती देण्यास  टाळाटाळ करणाऱ्या उद्योजकांवर कायदेशीर कारवाईचा  इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या वाहत ( PCMC) आहेत. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नदी सुधार  प्रकल्प हाती घेतला आहे. शहर  औद्योगिकनगरी असल्याने कारखान्यांची मोठी संख्या आहे.

Pimpri : कारखान्याला भेट देऊन ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले औद्योगिक जग

या कारखान्याचे औद्योगिक सांडपाणी काही प्रमाणात थेट नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून यावर उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे. याचीच दखल घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही  महापालिकेत बैठक घेतली होती.

औद्योगिक कारखान्यामधून निर्माण होणाऱ्या  सांडपाण्याबाबतची माहिती द्यावी, असे सुचविण्यात आले होते. त्यानुसार सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) उभारण्यासाठी आवश्‍यक आराखडा तयार करण्यात येणार आहे.

औद्योगिक सांडपाण्याबाबतची माहिती चिंचवडच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर कार्यालयाकडे 30 ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र अनेक उद्योजकांनी सांडपाण्याबाबतची माहिती दिली नाही.

त्यामुळे औद्योगिक परिसरात तयार होणाऱ्या सांडपाण्याची गुणवत्ता व क्षमता निश्चित होत नसल्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्‍यक आराखडा करण्यास अडचणी निर्माण होत ( PCMC)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.