Pimpri : रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे महिलेचे मूत्रपिंड वाचविण्यात यश

एमपीसी न्यूज – एका 29 वर्षीय महिलेच्या मूत्रपिंडाजवळ असलेल्या 6 सेंटीमीटर आकाराच्या ( Pimpri)  गाठीमुळे मूत्रपिंड अर्धे झाकल्याने महिलेचा जीवाला धोका निर्माण झाला होता. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे त्या महिलेचे प्राण वाचविण्यास डॉक्टरांना यश मिळाले.

मूत्रपिंडासारख्या नाजूक अवयवाला धक्का न लागता ती गाठ काढणे मोठे आव्हान होते. एरवी अश्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये मूत्रपिंड काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मोशी येथे राहणाऱ्या या महिलेच्या नातेवाईकांनी पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञांकडे उपचारासाठी दाखविले. त्यावेळी त्या महिलेच्या शरिराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात मूत्रपिंडाला एका गाठीने अर्धे झाकल्याचे आढळले.

त्यावेळी येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी ती गाठ काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढील उपचार करण्यास येथील तज्ज्ञ डॉक्टरांना संमती दिली. या महिलेला तीन महिन्यांपासून पोट दुखत होते. तसेच हिमॅट्यूरियाचाही त्रास होत होता. डीपीयूच्या रुग्णालयातील तज्ज्ञांनी अद्ययावत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूत्रपिंडाला जराही धक्का न लावता ( Pimpri) ती गाठ यशस्वीरित्या काढली आणि रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले.

Alandi : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचे सौभाग्य मला लाभले – धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज

या महिलेला रुग्णालयात पाच डिसेंबरला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील मूत्र रोग आणि कर्करोग शल्यचिकित्सक तसेच रोबोटिक विभागाचे संचालक डॉ. हिमेश गांधी यांच्याशी या रुग्णाच्या आजाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रिया करून ती गाठ काढण्याचा सल्ला दिला. ती गाठ मूत्रपिंडाभोवती असल्याने तीला धक्का न लावता काढण्याची जोखीम होती. तसेच रोबोटिकद्वारे शस्त्रक्रिया करताना थ्री डी पद्धतीने मूत्रपिंडाभोवतीची गाठ दिसू शकेल. त्यामुळे ती गाठ काढणे शक्य होईल, अशी डॉ. गांधी यांची त्यामागे भूमिका होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी डॉ. गांधी यांनी रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविली.

दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत पाच ठिकाणी छोटेखानी छिद्रे घेण्यात आली. त्यामुळे रक्तस्त्राव कमी झाला. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सुविधा आणि प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांमुळे ही रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करणे शक्य झाले. परिणामी, शस्त्रक्रियेनंतर ही महिला आजारातून लवकर बरी होऊ शकली. तसेच तिला चार दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर या महिलेला घरी सोडण्यात आले. आता ही महिला तिची दैनंदिन कामे नियमित करीत आहे. तसेच दुचाकी चालविणे यासारखी कामे ती व्यवस्थित करू शकत आहे.

मूत्र रोग आणि कर्करोग शल्यचिकित्सक तसेच रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. हिमेश गांधी म्हणाले, ‘एकीकडे अनेक रुग्णालयांनी त्या रुग्णाला मूत्रपिंड काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र आम्ही रुग्णाच्या मूत्रपिंडाला धक्का न लावता त्याच्या शेजारील गाठ काढून रुग्णाचे प्राण वाचविले आहेत. खरे तर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. त्या गाठीने मूत्रपिंडाला झाकून टाकले होते. प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध केल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करू ( Pimpri)  शकलो.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.