Alandi : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचे सौभाग्य मला लाभले – धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज

एमपीसी न्यूज – आळंदी येथे प पू. स्वामी गोविंददेव गिरी (Alandi) महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने आज दि.8 रोजी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे आळंदीत आगमन झाले. त्यांनी प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गीता महोत्सवात त्यांनी स्वामी राजेंद्रदास महाराज यांचे गीता कथनाचे श्रवण केले.

या कार्यक्रमाच्या दरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर)महाराज म्हणाले,  माझे सौभाग्य आहे ,भगवंताची कृपा प्राप्त झाली आहे ,प्रथम सौभाग्य हे की आळंदी तीर्थक्षेत्रात संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शनाचे सौभाग्य लाभले. दुसरा सौभाग्य कथा श्रवणाचा मिळाला. तिसरे सौभाग्य भारत देशात लाखो करोडो महापुरुष आहे. त्यापैकी संतांचे  सूर्यमोर्य जे व्यासपीठावर आहेत ते आमच्या दृष्टीने मलूक पिठचे महाराज. वास्तविक रूपामध्ये त्या परंपरेचे पालन करणारे, वास्तविक रुपात इतके ममत्व, स्नेह संतावर देत असलेले आणि संता विषयी अगाध श्रद्धा आहे .
खरे सांगायचे झाले तर आपले श्री वचन अमृताचे ऐकून संतांचा महिमा माहीत झाला. चौथे सौभाग्य आपला भारत अमृत महोत्सव करत आहे, त्यापैकी मी एक सौभाग्यशाली आहे . भारत अमृतमहोत्सव पाहण्यास भेटला. रामलल्लाचे मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठीत झालेले पाहण्यास मिळाले.धर्मचक्रवर्ती प.पू . रामानंदचार्य महाराज यांचा अमृत महोत्सव साजरा करताना पाहण्यास मिळाला. आज महाराष्ट्राच्या भूमीवर संतांचे ध्वज महाराष्ट्रात पुन्हा  फडकवणारे ,गुरुकुल पध्दतीद्वारे  महाराष्ट्रात सनातन संस्कृतीचे  चेतना जागृत करणारे प.पू. स्वामी गोविंद गिरी महाराजांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.

तसेच ते म्हणाले चांगला वक्ता बनण्यापूर्वी चांगला श्रोता बना,चांगले बाप व्हायचे असेल तर चांगला मुलगा बना, चांगला गुरू व्हायचे असेल तर चांगला शिष्य बना.यामुळे मी ऐकण्यासाठी आलो आहे.संतांचे दर्शन झाले दिवस चांगला झाला.संत ज्ञानेश्वर महाराज यांची परंपरा मानणारे धन्य आहेत. मी पण धन्य आहे , या भारत देशात माझा जन्म झाला. जिथे  संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे महापुरुष प्रकट झाले. हे साधारण महात्मा नव्हते  चांगदेवांच्या चमत्काराला त्यांनी भागवत भक्तीप्रचार, प्रबुद्धद्वारे नमस्कार करायला भाग पाडले व शिष्य बनवले.
 संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीवाला सुद्धा अधीन केले. हा तो महाराष्ट्र आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता. या मंत्रा वरूनच म्हणत आहे भारत हिंदू राष्ट्र बनून (Alandi) राहील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.