Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वर्धापन दिनानिमित्त 12 हजार झाडांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोट्रक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी, 242 बटालियन सीआरपीएफ तळेगाव दाभाडे आणि वनविभाग वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने 12 हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सोमाटणे फाटा येथील वनविभागाच्या पाच एकर जागेवर 12 हजार वृक्षांची ही वनराई बहरणार आहे.

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचा ‘देवदूत’ डॉ शाळीग्राम भंडारी यांना प्रदान

कार्यक्रमासाठी मावळचे तहसीलदार विक्रांत देशमुख, कमाडण्ट श्रीमान पारसनाथ, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3131 मंजू फडके, वनाधिकारी हनुमंत जाधव, सिनेअभिनेते राजन भिसे, रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे व सर्व पदाधिकारी व सभासद, हर्षद जव्हेरी व रोट्रक्ट सदस्य, सीआरपीएफचे जवान, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे सदस्य,नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मान्यवर पाहुण्यांचा रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तहसीलदार विक्रांत देशमुख, वनाधिकारी हनुमान जाधव, डीजी मंजू फडके,कमांडंट श्रीमान पारसनाथ यांनी भौगोलिक दृष्ट्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे हे सांगताना रोटरी सिटीच्या कार्याचे कौतुक केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश नागरे यांनी केले रोटरीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती व लावलेली झाडे जगवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याची माहिती अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी दिली.

 

वनविभागाच्या प्रशस्त जागेत मान्यवरांच्या हस्ते 12 हजार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण ओसवाल यांनी केले. विलास काळोखे,दिलीप पारेख,सुरेश धोत्रे, भगवान शिंदे, संतोष परदेशी, प्रदीप मुंगसे,संजय वाघमारे,प्रसाद पादिर,राकेश ओसवाल, तानाजी मराठे, रामनाथ कलावडे, सूर्यकांत म्हाळसकर,प्रशांत ताये,सुनंदा वाघमारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.