Lonavala : शहरात पोलीसांचा रुटमार्च

एमपीसी न्यूज़ – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, तसेच पोलीसांची सजगता नागरिकांना समजावी याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यापासून गवळीवाडा नाका, मावळा पुतळा चौक, शिवाजी महाराज चौक ते भांगरवाडी व पुढे कुसगावच्या हद्दीपासून पुरंदरे शाळा ग्राऊंड असा सुमारे दिड तासाचा रुटमार्च काढण्यात आला होता.     

लोणावळा विभागाचे पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी, महिला पोलीस या रुटमार्च मध्ये सहभागी झाले होते. शहराच्या सर्व भागातून हा रुटमार्च काढण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.