Pune : चारित्र्यावर संशय घेतल्याने 28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-सास-याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्न झाल्यानंतर सतत चारित्र्यावर (Pune) आक्षेप घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने 28 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वुई होम लेक सोसायटी 28 मे रोजी हा प्रकार घडला. हर्षल उके असे आत्महत्या केलेल्या विवाहितीचे नाव आहे.

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी पती वरूण धुपे, सासरे सुरेश धुपे, सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात. संजीव गुलाबराव उके यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

 

Pune : बंदुकीच्या धाकाने हॉटेल वैशालीची मालकी घेतली; विवाहितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांची मुलगी हर्षल उके तिच्यावर तिचा पती वरूण धुपे याने विवाहबाह्य संबंध असल्याचा तसेच चारित्र्यावर आक्षेप घेऊन वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला. तिला सतत अपमानास्पद वागणूक देऊन भांडणासाठी उसकावून तिला आत्महत्या करण्यासाठी परावृत्त केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.