Pune : मेजर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया

एमपीसी न्यूज – सैन्य दलात उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे (Pune) भासवून खडकी येथील रिटायर अधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या भामट्याने खडकीतील रिटायर्ड सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफॉर्म व इतर साहित्य खरेदी करून त्यांची फसवणूक केली आहे.

तसेच सैन्य दलाचे प्रमुख कार्यालयाचे परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवून, तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयाचे पत्त्याचा वापर करुन बनावट आधारकार्ड काढून तसेच पॅनकार्ड व ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचे युनिफॉर्म परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केल्याने पोलिसांनी त्याल अटक केली आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रशांत भाऊराव पाटील (वय-32) वर्ष सध्या रा. म्हेत्रे निवास दुर्गानगर, सोनवणेवस्ती चिखली पुणे व मुळ रा. मु.पो. कुपटगिरी ता. खानापुर जि.बेळगाव कर्नाटक याला अटक केली आहे.

Pune : चारित्र्यावर संशय घेतल्याने 28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-सास-याविरोधात गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी प्रशांत भाऊराव पाटील हा सन 2019 पासून ते आज पर्यंत भारतीय सैन्य दलामध्ये असल्याचे भासवून,त्याने खडकी पुणे येथील दुकानदार रिटायर्ड सुभेदार मेजर सुरेश मोरे यांचेकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफॉर्म व इतर साहित्य किं.रु.4,700/- चे खरेदी करुन पैसे नंतर देतो असे सांगून अद्याप पर्यन्त पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

तसेच त्याने सदन कमांड मध्ये कार्यरत असल्याचे भासवून सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करुन व सैन्य दलाचा युनिफॉर्म असलेले फोटो बनावट आय.डी. वापरुन सदनकमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन पुणे या सैन्य दलाचे प्रमुख कार्यालयाचे परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवून, तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयाचे पत्त्याचा वापर करुन बनावट आधारकार्ड काढून तसेच पॅनकार्ड व ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचे युनिफॉर्म परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केली असल्याने त्याला अटक करण्यात आली (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.