Pune : MPSC पास दर्शनाचा राजगडाच्या पायथ्याला मृतदेह सापडला, वाचा काय झाल…..

एमपीसी न्यूज – स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून फॉरेस्ट (Pune) ऑफिसर पदावर निवड झालेल्या  26 वर्षीय दर्शना दत्तू पवार या तरुणीचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.

दर्शना मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची.  गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. काही दिवस पुण्यात देखील तिने क्लास केले होते. त्यानंतर गावाकडे जात तिने सेल्फ स्टडी केली आणि नुकतीच स्पर्धा परिक्षेत पास झाल्याने तिची फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिची निवडही झाली होती. इतकेच नाही तर तिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता.

Pune : मेजर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेडया

तिच्या या घवघवीत यशानंतर पुणे शहरातील एका संस्थेच्या वतीने तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.. त्यासाठी ती 9 जूनला पुण्यात आली होती. पुण्यातीलच एका मैत्रीणीच्या घरी ती राहत होती.. बारा जून रोजी ती एका मित्रासोबत सिंहगड किल्ला परिसरात ट्रेकिंग साठी गेली होती. याबाबत तिने तिच्या मैत्रिणीला आणि कुटुंबीयांनाही कल्पना दिली होती.

12 जून नंतर दर्शनाचा फोन बंद झाला.अचानक फोन बंद झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. कुटुंबीयांनी तीन दिवस तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नसल्याने कुटुंबीयांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.दर्शनाचा मित्रही अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी या दोघांचाही शोध सुरू केला.
दोघांचीही शेवटचे मोबाईल लोकेशन वेल्हा तालुक्यात दाखवत होते.पोलिसांनी वेल्हा तालुक्यात शोधा शोध सुरू केली असता राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका झुडपात दर्शनाचा मृतदेह सापडला. अतिशय कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. तर दुसरीकडे दर्शनाच्या सोबत असलेला तिचा मित्रही बेपत्ता आहे.त्याचाही ठावठिकाणा अद्याप सापडला नाही. त्यामुळे या दोघांसोबत नेमकं काय घडलं याचा शोध आता पोलीस घेत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.