Pune : आयात-निर्यातीच्या व्यवसायाचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 91 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयात-निर्यातीच्या व्यवसायातून जादा परताव्याचे( Pune ) आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 91 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सौदी मक्का येथे व्यवसायाचे आमिष फिर्यादीला दाखवण्यात आले होते.

याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ (वय 45 रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमाआबादी (वय 40), सीमा नादीर नईमाआबादी (वय 35, दोघे रा. कॅम्प,पुणे), शोएब मैनुद्दीन अत्तार (वय 35, रा. बोपोडी), माजीद उस्मान अत्तार (वय 50, रा. बोपोडी), खालिद मैनुद्दीन अत्तार (वय 40, रा. बोपोडी) आणि इरम शोएब अत्तार (वय 32, रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे आहेत.

Pune : पुणे शहर पोलिसांनी सार्वजनिक सोयीसाठी लाँच केला गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचा पादत्राणाचा होलसेल व रिटेल व्यवसाय आहे. शोएब आणि नादीर यांनी फिर्यादीला आयात-निर्यातीच्या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. शेख यांनी विश्वास ठेवून वेळोवेळी 90 लाख 75 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. परंतु परतावा मिळत नसल्याने त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली.

परंतु आरोपींनी बनावट कागदपत्र दाखवून सौदी मक्का येथे व्यवसायाचे आमिष फिर्यादीला दाखवले. तसेच, शोएबने जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य करुन फिर्यादीला गुंगीकारक पाणी पिण्यास दिले. तसेच, ताविज बनवून देण्यासाठी पैसे घेतले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम याचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे ( Pune ) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.