Pune : कोरोना काळातील घोटाळा प्रकरणी डॉ आशिष भारतीसह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या वारजे येथील अरविंद बारटक्के रुग्णालयात कोरोना ( Pune) काळात घडलेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटिजेन कीटमध्ये हा घोटाळा झाला होता. वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीची शक्यता, रविवारी गारपीटीचा अंदाज

तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील स्वॅब सेंटरचे प्रमुख डॉ. हृषिकेश गारडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला ( Pune)आहे. फसवणूक व इतर कलमाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तक्रारदार सतीश काेळसुरे यांनी तक्रार दिली आहे. भारतीय दंडविधान संहिता 1860 चे कलम  420, 406, 409, 465, 466, 467, 468, 471 आणि 34 व फाैजदारी संहिताचे कलम 156 (3) प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, पुणे महानगरपालिकेला कोरोना काळात शासनाकडून तपासणीसाठी रॅपिड अँटीजेन किट मिळाले होते. यामध्ये हा घोटाळा झाला होता. महानगरपालिकेच्या वारजे येथील अरविंद बारटक्के रुग्णालयाला मिळालेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी बहुतांश किटची परस्पर विक्री झाली होती. उत्तर जवळपास 11000 हून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी या ठिकाणी सापडल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात तब्बल 70 ते 80 लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी लाटले असल्याचे म्हटले ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.