Pune : स्वारगेट बस स्थानकावर रिक्षा चालकाने प्रवाशाच्या कानाचा लचकाच तोडला

एमपीसी न्यूज-स्वारगेट बस स्टँड परिसरात रिक्षा भाड्याच्या ( Pune) कारणावरून प्रवासी आणि रिक्षा चालकात हाणामारी झाली. रिक्षा चालकाने प्रवाशाला मारहाण करत त्याच्या कानाचा लचकाच तोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

स्वारगेट बस स्टॅन्ड जवळ सातारा रस्त्याला असणाऱ्या रिक्षा स्टँडवर एक जून च्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी संतोष दशरथ चव्हाण (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन रिक्षा चालकांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

Pimpri : कामगारांच्या पाल्यांसाठी पुन्हा मोफत बस सेवा सुरु करावी – रयत विद्यार्थी विचार मंच

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवर आले होते. यावेळी रिक्षा भाड्याच्या कारणावरून त्यांचे आणि  रिक्षा चालकाचे भांडण झाले. या भांडणातून आरोपी रिक्षा चालकाने फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

इतकेच नाही तर आरोपी रिक्षा चालकाने फिर्यादीच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेऊन लचका तोडून काढला. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.