Pune : जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रपोज करून ( Pune ) प्रतिसाद दिला नाही तर जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन तिच्या सोबत अतिप्रसंग करण्यात आला.

हा प्रकार मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगर येथे घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आकाश जमादार (वय 27) याला अटक केली आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 2021 ते 2023 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. फिर्यादी या अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही आरोपीने त्यांना प्रपोज करून त्याच्यावर प्रेम नाही केले तर जीवाचे बरे वाईट करुन घेईन  अशी धमकी दिली.
तसेच आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी भाजी घेऊन बोलावले आणि फिर्यादीवर अतिप्रसंग केला. याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. मार्केट यार्ड ( Pune ) पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.