Pune : सहकार नगर येथे झाड रिक्षावर कोसळून एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज- मुक्तांगण शाळेजवळ रिक्षावर झाड (Pune ) कोसळून एका महिलेला मृत्यू झाला. काल संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला 04.54 वाजता या घटनेची वर्दि मिळाली. माहिती मिळताच जनता अग्निशमन केंद्र आणि मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली होती.अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तार कंपाउंडमध्ये असलेले एक मोठे झाड रिक्षावर कोसळले होते. रिक्षेतील एक महिला या घटनेत गंभीर जखमी अवस्थेत अडकल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिले. रिक्षामध्ये एकूण चार महिला आणि एक लहान मुलगा प्रवास करत होता. त्यापैंकी तीन महिला व लहान मुलगा (वय3 वर्ष) यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले होते. तसेच रिक्षाचालक किरकोळ स्वरूपात जखमी होता.

PCMC : दीड महिन्यात आरोग्य विभाग प्रमुखांची बदली

अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर गंभीर जखमी असलेल्या महिलेची सुटका करून तातडीने शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 मधून रुग्णालयात रवाना केले. या घटनेत रिक्षाचे व एका टपरीचेही नुकसान झाले आहे. जखमी महिलेला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सॉ, घन, पहार, रश्शी अशा विविध अग्निशमन साहित्याचा वापर केला. पण या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. लीला काकडे (वय अंदाजे 50वर्ष, राहणार आंबेगाव, जांभुळवाडी (ससून रुग्णालय), असं मृत महिलेचे नाव आहे.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी रविंद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल संदिप घडशी आणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भुषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी सहभाग घेतला.रिक्षात एकूण 4 महिला आणि एक लहान मुलगा होता. या घटनेत लीला काकडे या महिलेचा मृत्यू झाला. तर नम्रता सचिन पोळ (वय 46), कमल अडिकामे (वय 69), मीना पुरुषोत्तम पोळ (वय 61) या महिलांना रिक्षातून बाहेर काढण्यात आलं. पण लहान मुलाचे व रिक्षाचालकाचे नाव समजू शकले (Pune ) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.