PCMC : दीड महिन्यात आरोग्य विभाग प्रमुखांची बदली

एमपीसी न्यूज – दीड महिन्यापूर्वी महापालिकेमध्ये ( PCMC)  विभागप्रमुखांच्या आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बदल्या केल्या. मात्र, आरोग्य विभागाच्या विभागप्रमुखांची बदली करून प्रतिनियुक्तीवर आलेल्या यशवंत डांगे यांच्याकडे आरोग्य विभागाची धुरा सोपविली आहे. तसेच तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे सहाय्यक आयुक्त पालिकेत रूजू झाले आहेत.

आयुक्त सिंह यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त अशा 18 अधिकाऱ्यांची 13 एप्रिलला बदली केली होती. या बदल्यामध्ये उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडील आरोग्य विभाग स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांच्याकडे दिला तर चारठाणकर यांच्याकडे समाज विकास विभागाची पुन्हा जबाबदारी देण्यात आली. मात्र, दीड महिन्यातच जळक यांच्याकडून आरोग्य विभागाचा कार्यभार काढण्यात आला आहे. नव्याने रूजू झालेले सहाय्यक आयुक्त डांगे यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Pune : कलापिनी कोमकली यांच्या सादरीकरणातून पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन

तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे सहाय्यक आयुक्त म्हणून  पालिकेत रूजू झाले आहेत. सरनाईक यांनी तळेगावात मुख्याधिकारी म्हणून काम पाहताना स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणासाठी चांगले काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामामुळेच “माजी वसुंधरा अभियाना”त तळेगावचा राज्यस्तरीय गटात सहावा क्रमांक आला ( PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.