Pune : मानाच्या व प्रमुख मंडळाच्या पदाधिका-यांच्या हस्ते ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती

एमपीसी न्यूज –  मानाच्या व प्रमुख गणपती मंडळाच्या पदाधिका-यांच्या ( Pune) हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मंगळवारी सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी सर्व मंडळांचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते.

Today’s Horoscope 27 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित ( Pune)  होते.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी व प्रशांत टिकार, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मंडळाचे प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडित,

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, जान्हवी बालन, श्री जिलब्या मारुती गणपती मंडळाचे भूषण पंड्या यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित ( Pune) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.