Pune : पुण्याहून सुटणारी आझाद हिंद एक्सप्रेस बुधवारी रद्द

एमपीसी न्यूज- काही कारणास्तव परत येणाऱ्या गाड्या न आल्यामुळे पुणे आणि मुंबईहून हावडा येथे जाणाऱ्या काही गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्याची सूचना मध्य रेल्वेने जारी केली आहे. यामध्ये पुण्याहून संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी 12129 पुणे हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे-

12809 छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हावडा (व्हाया नागपूर)
12129 पुणे ते हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
12151लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा समरसता एक्सप्रेस
12859 छत्रपती शिवाजी टर्मिनस ते हावडा गीतांजली एक्सप्रेस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.