Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विसर्जन घाटाची स्वच्छता

एमपीसी न्यूज- गणेश विसर्जनाच्या वेळी चिंचवड येथील घाटावर अस्ताव्यस्त पसरलेले सुमारे एक टन निर्माल्य संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा व्हालेंटिअरिंग यांच्या वतीने गोळा करून संपुर्ण घाटाची स्वच्छता करण्यात आली. आज, मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत घाटाची स्वच्छता करण्यात आली.

यासाठी ब प्रभाग अधिकारी मनोज खोत आरोग्य अधिकारी कुंडलीक दरवडे आरोग्य निरीक्षक कंचन इंदलकर यांनी सहकार्य केले या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, विश्वास राऊत, धनंजय सावंत, मनोहर कड, मंजुषा रत्नपारखी, अनुष्का कराळे, खंडुशेठ चिंचवडे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.