Pune : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संस्कार जत्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठानच्या (Pune) वतीने श्री स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची संस्कार जत्रा आणि महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. मागील दोन वर्ष करोनाच्या कालावधीत जत्रा झालेली नव्हती. त्यामुळे यंदा नव्या जोमाने पुन्हा हा उपक्रम यावर्षी रविवार 8 जानेवारी रोजी सुरू झाला असून तो 12 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे.

यावर्षी जत्रेचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याचे आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते झाले.  या प्रसंगी राष्ट्रवादी कामगार सेल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, टाटा मोटर्स एम्प्लाॕईज युनियनचे कार्याध्यक्ष अशोक मानेमराठी, अभिनेत्री मोहिनी कुडेकर, संगमनेर तालूका जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मेमाणे, आरोग्य अधिकारी सागर सणस, ज्ञानदिप मित्र मंडळ बिजलीनगरचे अध्यक्ष महेश कलाल कष्टकरी कामगार संघटनेचे कामगार नेते काशिनाथ नखाते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

संस्कार जत्रेची सुरुवात प्लॅस्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाने (Pune) झाली. या प्रसंगी आयुक्त रविराज इळवे यांनी प्रतिष्ठानच्या कार्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, प्राणी आणि वनस्पतींच्या काही प्रजाती लुप्त झाल्या आहेत, तर काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्याचप्रमाणे संस्कार, संस्कृती आणि सद्भावना समाजातून लुप्त होत असल्याने सामाजिक संतुलन देखील बिघडत आहे. संस्कार, संस्कृती आणि सद्भावना यांचें संवर्धन करण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे, समाजाची ही गरज विचारात घेऊन संस्कार प्रतिष्ठापनामार्फत या मुल्यांच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत.

कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांनी संस्थेच्या कार्यांचे कौतूक केले. या कार्यक्रमात आयुक्त रविराज इळवे यांचा सपत्निक कार्यक्षम अधिकारी म्हणून कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर अभिनेत्री मोहिनी कुडेकर कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा नम्रता बांदल यांनी केले आभार रंजना जोशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.