Pimpri News: ‘साह्यथॉन 2023 मध्ये धावले 1 हजार स्पर्धक

एमपीसी न्यूज – साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या (Pimpri News) संयुक्त विद्यमाने ‘एक पाऊल आरोग्यासाठी!’ हे ब्रीदवाक्य घेऊन रविवारी (दि.8) आयोजित केलेल्या ‘साह्यथॉन 2023’ स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. औद्योगिक नगरीत झालेल्या साह्यथॉनमध्ये 3, 5,10 किलो मीटरसाठी 14 वर्षाखालील मुले- मुली, महिला व पुरूष खुलागट तसेच सिनीअर सीटीजन या प्रकारात एकूण 1 हजार स्पर्धक धावले.

चौथ्या पर्वातील मॅरेथॉनची सुरुवात बॉक्सिंग क्रिडा प्रकारात अर्जन पुरस्कार, श्री शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार या पुरस्काराचे मानकरी कॅप्टन गोपाल नारायण देवांग यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून फ्लॅग ऑफ करण्यात आला. साह्यकडा एडवेंचरचे अंकुश मुक्किरवार, अरविंद भोसले हे साह्यथॉन 2023 चे लीडर होते. त्यांना शंकर पाटील, श्रीकांत लोमटे, अमरजीत शेळके, श्रीराम पवळे, महेंद्र पोतकुले, योगेश पोलगवंडे, उन्मेश देशमुख, नागनाथ दोडके, राजू गुनवंत यांनी सहकार्य केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे आणि साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

संयोजकांकडून या (Pimpri News) कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांचे एकूण 200 सदस्य स्वयंसेवक म्हणून काम पहात होते. संयोजकांकडून ठेवण्यात आलेल्या अल्प नोंदणी फीमध्ये स्पर्धकास विनर ट्रॉफी, फिनीशर मेडल, साह्यथॉन कॅप, हाइड्रेशन पॉइंट्स, हेल्दी स्नॅक्स, वैद्यकीय सुविधा (मेडिकल सपोर्ट) उपलब्ध करून दिल्या. लोटस फिटनेसने सादर केलेल्या झुंबाच्या तालावर स्पर्धक थिरकले. आरोग्यबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या साह्यथॉन 2023 साठी सामाजिक भान जपणार्‍या गुरूकुल कोचिंग क्लासेस, एच टी खांदवे असोसिएट, निर्वाना रियालिटीज, गुंजकर हॉस्पिटल, ई-गॅलेक्सी मोटर्स, स्वामी समर्थ डेव्हलपर्स, निसर्ग शाळा, स्टार स्पोर्ट्स, लॅपटॉप प्लस, यशश्री क्लिनिक, स्टडी स्मॉर्ट, सबलीम इंटेरियर डेकोरेटर, साई श्रद्धा ई सेवा केंद्र, नाझिर अली सन्स, ए. सी. इ. इंजिनिअर, मोमीन एल. आय. सी., लोटस फिटनेस क्लब अशा स्पॉन्सर्सची मोलाची साथ लाभली.

स्पर्धेतील विजेते

कॅप्टन गोपाळ देवांग, नारायण बहिरवाडे, बाबाजी चौधरी तसेच साह्यथॉन 2023 स्पॉन्सर्स यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. 10 कि. मी. महिला गटात सरोज गवास यांचा प्रथम क्रमांक आला. तर, कोमल चिरमे द्वितीय, सलोनी प्रसाद यांचा तृतीय क्रमांक आला. 10 कि. मी. पुरूष गटात सुरेश देसाई, सुरज मुंगसे, शुभम काळे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. 10 कि. मी. मुले 14 वर्षा खालील गट अविनाश भंडारी, अनुराग सोप्पा, अनिरुद्ध वाडीकर यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. 10 कि. मी. सिनिअर सिटीझन पुरुष गटात उदय उपाद्ये यांचा प्रथम क्रमांक आला. 5 कि. मी. महिला गटात रेणू सोनगरे, वैशाली मद्रेवार, रजनी भुजबळ यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला.

5 कि. मी. पुरूष गटात आदित्य गाढवे, बसवराज वाघमारे, सार्थक जीपटे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. 5 कि. मी. मुली 14 वर्षा खालील गटात रितिका झुरुंगे, अनुष्का स्वामिनाथन, निर्मयी औटी यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. 5 कि. मी. मुले 14 वर्षा खालील गटात श्रेयश पाटील, चेतन जगताप, श्रेयश तांबे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. तर, 5 कि. मी. सिनिअर सिटीझन महिला गटात मालिका राधाकृष्णन यांचा प्रथम क्रमांक आला. 5 कि. मी. सिनिअर सिटीझन पुरूष गटात बाळकृष्ण ठिगळे यांचा प्रथम तर फोके यांचा द्वितीय क्रमांक आला. 3 कि. मी. खुला महिला गटात स्वाती पाटील, अस्मिता देसले, स्मिता पाटील यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक (Pimpri News) आला.

Pune : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संस्कार जत्रेचे आयोजन

3 कि. मी. खुला पुरूष गटात विकास धीमे, तुषार भुतनर, देवानंद गिरी, 3 कि. मी. मुली 14 वर्षा खालील गटात मृणाल कोठावडे, नित्या दार्वेकर, इशिता नागोटकर, 3 कि. मी. मुले 14 वर्षा खालील गटात संस्कार मोकाशी, गौरव निर्मल, मयंक पाटील, 3 कि. मी. सिनिअर सिटीझन महिला गटात वंदना आपटे, माधुरी शेट्टी, शारदा पाटील, 3 कि. मी. सिनिअर सिटीझन पुरूष गटात बाळासो पाटील, हरिनारायण शेळके, श्रीकांत नलगे यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आला. एकूण 16 गटांत 43 विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली. साह्यथॉन 2023 यशस्वी होण्यास स्पॉन्सर्स, स्पाईनरोड रोड स्प्रिंटर्स, साह्य रायडर्स, साह्यकडा बाईकर्स, श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक संघ, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, पिंपरी चिंचवड ट्रॅफिक पोलीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.