Chinchwad : आदिवासी पाड्यावर संस्कार प्रतिष्ठानचा हळदी कुंकू समारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने ( Chinchwad ) खालापूर तालुक्यातील बीड खुर्द या आदिवासी पाड्यावर रविवारी (दि. 4) हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. यामध्ये आदिवासी महिलांना प्रतिष्ठानच्या वतीने वाण म्हणून एक साडी आणि एक किलो साखर देण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन खोपोलीचे नगरसेवक किशोर पानसरे यांच्या हस्ते झाले. हळदी कुंकू समारंभात आदिवासी पाड्यावरील 70 महिला सहभागी झाल्या. संस्कार प्रतिष्ठान कडून दरवर्षी आदिवासी पाडे, अंध, अपंग विद्यार्थी यांच्यासोबत विविध उपक्रम राबवत असते. यावर्षी हळदी कुंकू समारंभ रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या बीड खुर्द या आदिवासी कातकरी पाड्यावर घेण्यात आला.

ACP / DySP Transfer : राज्य पोलीस सेवेतील 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या

कातकरी जमातीमधील जेष्ठ महिला अलका पवार यांनी भावना व्यक्त केल्या. ‘माझ्या जमातबांधवांवर आतापर्यंत अनेक संकटे आली. पण आमच्या घरापर्यंत कोणीही मदतीला धाऊन आले नाही. आजपर्यंत हळदी-कुंकू कसले आणि दिवाळी कसली कोणतेच सण आम्हाला माहित नसतात. आम्ही आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करतो. मोलमजुरी करुन पोट भरतो.’ ‘संस्कार प्रतिष्ठानने आमच्या महिलांसाठी प्रथमच हळदी कुंकू समारंभ आयोजित केला, याचा आम्हाला आनंद असल्याचे कमल कातकरी यांनी सांगितले.

संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आनंद पाथरे, कैलास मोरे, संचालिका प्रिया पुजारी, स्वाती म्हेत्रे, मनिषा आगम, सुनिता गायकवाड, मोहिनी सुर्यंवंशी, गायत्री माळी, सायली सुर्वे, संध्या स्वामी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. खोपोली येथील आदिवासी बांधव संतोष मेंगाळ यांनी सहकार्य केले. सरपंच भाऊ पवार यांनी आभार ( Chinchwad ) मानले.

https://www.youtube.com/watch?v=x_6bVP8etdA.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.