ACP / DySP Transfer : राज्य पोलीस सेवेतील 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या

देविदास घेवारे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली

एमपीसी न्यूज – राज्य पोलीस सेवेतील 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या ( ACP / DySP Transfer ) झाल्या. त्यातील 15 अधिकारी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. या बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात एका अधिकाऱ्याची तर पुणे ग्रामीण मध्ये दोन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले देविदास काशिनाथ घेवारे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहायक आयुक्त पदावर बदली झाली आहे.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले सुदर्शन साईदास राठोड यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बारामती विभागाचे पोलीस उप अधीक्षक पदी पदस्थापना करण्यात आली आहे. तर बारामतीचे पोलीस उप अधीक्षक गणेश इंगळे यांची नांदेड ग्रामीण पोलीस दलात पोलीस उप अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

Metro E Ticket : मेट्रोचे तिकीट मिळवा व्हाॅटस ॲपवर

पुणे ग्रामीणच्या शिरूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक यशवंत गवारी यांची सोलापूर शहर येथे सहायक आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी ठाणे ग्रामीण मधील गणेशपुरी येथे उप अधीक्षक असलेले प्रशांत बाबासाहेब ढोले यांची बदली झाली आहे.

पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या पद्मावती शिवाजी कदम यांची अपर पोलीस अधीक्षक (ए ट प) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पदस्थापना करण्यात आली आहे. तसेच सातारा ग्रामीणचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र धैर्यशील शेळके यांची देखील अपर पोलीस अधीक्षक (ए ट प) गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली करण्यात आली ( ACP / DySP Transfer ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.