Metro E Ticket : मेट्रोचे तिकीट मिळवा व्हाॅटस ॲपवर

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोचे तिकीट ( Metro E Ticket)   व्हाॅटस ॲपवर (Pune Metro e-ticket on WhatsApp) मिळण्याची सुविधा सुरु केली आहे. चार स्टेपमध्ये हे तिकीट प्रवाशांना काढता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा तिकीट काउंटरवर रांगेत उभा राहण्याचा वेळ वाचणार आहे.

पुणे मेट्रोने व्हाॅटस ॲप  तिकिटासाठी +91 94201 01990 हा अधिकृत नंबर (PuneMetro Official WhatsApp account) जाहीर केला आहे. त्यावर प्रवाशांना सुरुवारीला Hi असा मेसेज करावा लागेल. त्यानंतर कुठून कुठवर (departure and arrival stations) प्रवास करायचा आहे ती स्थानके निवडावी लागतील. प्रवाशांची संख्या, एकेरी (singal), दुहेरी (Return) तिकीट पाहिजे याबाबत माहिती भरावी लागेल.

PCMC : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळेना, पालिकेच्या 15 प्रकल्पांना मुहूर्त मिळेना

त्यानंतर तिकिटाचे पैसे ऑनलाईन भरण्यासाठी युपीआयचे पर्याय उपलब्ध होतील. त्यातील आपल्या सोयीचा पर्याय निवडून तिकिटाचे पैसे भरताच व्हाॅटस ॲप ई-तिकीट प्राप्त होईल. त्या तिकिटावरील क्यूआर कोड मेट्रो स्थानकावरील प्रवेशद्वारावर स्कॅन करून मेट्रोने प्रवास करता येईल.

मेट्रो स्थानकावर चालत असताना प्रवासी अशा पद्धतीने तिकीट काढू शकतात. मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच सातत्याने नवीन नियम देखील जाहीर केले जात ( Metro E Ticket)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.