Metro : मेट्रोकडून एसटी आगाराचे नुतनीकरण

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Metro) पिंपरी- चिंचवड (वल्लभनगर) आगाराच्या नुतनीकरणाचे काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) प्रशासनामध्ये नूतनीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामावरून मतभेद सुरू होते. मात्र, तीन महिन्यांपासून बंद असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

मेट्रो प्रशासनाने पिंपरी ते सिव्हिल कोर्ट मार्गावर संत तुकारामनगर मेट्रो स्थानक उभारण्यासाठी एस.टी. महामंडळाची चार हजार चौरस मीटर जागा घेतली आहे. या जागेच्या बदल्यात पिंपरी-चिंचवड आगाराचे नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण करून देण्याचा करार मेट्रो प्रशासनाने केला आहे. आगारात पूर्ण काँक्रिटीकरण, रंगरंगोटी, वॉटरप्रूफिंग, फरशी बसवणे, डागडुजीसह इतर कामे करण्याचे करारात ठरले आहे.

Loksabha Election : निवडणूक काळातील आर्थिक गैरव्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर; नियंत्रण कक्षाची स्थापना

मागील वर्षी मेट्रो प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवड एसटी आगारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले होते. मात्र, काम अचानक बंद करण्यात आले. एस.टी. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मेट्रोने काम अर्धवट केले, तर करारात ठरल्यानुसार काम पूर्ण करून (Metro) दिले असल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला होता. तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.