Loksabha Election : निवडणूक काळातील आर्थिक गैरव्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर; नियंत्रण कक्षाची स्थापना

एमपीसी न्यूज – निवडणुक काळात (Loksabha Election) होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर आयकर विभागाची करडी नजर असणार आहे. संशयित आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाच्या पुणे शाखेने 24×7 कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी फोन कॉल, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नोंदवून या कक्षाला माहिती देऊ शकतात.

 

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आयकर विभागाने निवडणुकांच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस (24×7) कार्यरत असेल.

PCMC : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दोन उपायुक्तांच्या बदल्या

 

या कक्षात नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी 2024 च्या लोकसभा (Loksabha Election) सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती / तक्रारी देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक, ईमेल किंवा पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.

 

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0353

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0354

व्हॉट्सॲप क्रमांक : 9420244984

ईमेल आयडी : [email protected]

नियंत्रण कक्षाचा पत्ता : रूम क्र. 829, 8वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे 411037.

https://www.youtube.com/watch?v=YN470gAkDJA&t=39s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.