Pune Metro : पुणे मेट्रोच्या सात स्थानकांना हरित स्थानकांचे मानांकन

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या सात मेट्रो स्थानकांना हरित स्थानकांचे (Pune Metro) सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) यांच्याकडून हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी या सात स्थानकांना ‘प्लॅटिनम’ रेटिंग प्रदान करण्यात आले आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये दोन कॉरिडॉर आहेत, उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (पर्पल लाईन) आणि ईस्ट-वेस्ट कॉरिडॉर (अक्वा लाईन) ज्याची एकूण लांबी 33.2 किमी आणि 30 स्टेशन्स आहेत. एलिव्हेटेड सेक्शनची लांबी 27.2 किमी आणि भूमिगत विभागाची लांबी 6 किमी आहे. 23.66 किमी सध्या लोकांसाठी खुले आहे आणि उर्वरित 9 किमीच्या भागाचे काम जोरात सुरू आहे.

Pimpri : रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा – सीमा सावळे

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC), भारतीय उद्योग परिसंघाची (CII) 2001 मध्ये स्थापना करण्यात आली. ती भारताची प्रमुख प्रमाणन संस्था म्हणून काम करते आणि त्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. या संस्थांकडून हरित इमारतींना विविध स्तरांवर रेटिंग प्रदान केले जाते. पाणी व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब, कचरा व्यवस्थापन आणि प्रवाशांचे आरोग्य आदींच्या आधारावर पुणे मेट्रोच्या स्थानकांचे मुल्यांकन करण्यात आले आहे.

पुणे मेट्रोच्या वनाझ, आनंदनगर, आयडियल कॉलनी, गरवारे कॉलेज, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनचे मुल्यांकन प्रगतीपथावर आहे, भविष्यात पुणे मेट्रोची सर्व स्थानके IGBC च्या सर्वोच्च क्रमवारीसाठी पात्र असतील, असा विश्वास मेट्रोकडून व्यक्त करण्यात (Pune Metro) आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.