Pune Metro : कसबा पेठ मेट्रो स्टेशन हेच नाव देणे आवश्यक; मूळ रहिवासी संघाची मागणी

एमपीसी न्यूज – कसबा पेठ मेट्रो स्टेशन हेच नाव देणे (Pune Metro) आवश्यक असल्याचे मूळ कसबा रहिवासी संघातर्फे सुहास ढोले आणि रमेश भांड यांनी म्हटले आहे. कसबा पेठेतील नागरिकांनी देखील याबाबत आग्रही राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुणे मेट्रो शहराच्या मध्यभागातून जाताना कसबा हे मेट्रो स्टेशन महत्त्वाचे आहे. हे मेट्रो स्टेशन कसबा पेठेतील मनपा शाळा क्र. 8 येथे आहे. असे असूनही कसब्यातील या मेट्रो स्टेशनला बुधवार पेठ मेट्रो स्टेशन असे का संबोधले जाणार आहे, हे अनाकलनीय आहे. वास्तविक मूळ पुणे हे ‘कसबा पुणे’ या नावाने ओळखले जायचे.

पुण्याचे ग्रामदैवत देखील कसबा गणपती हेच आहे. या पार्श्वभूमीवर कसब्यातील मेट्रो स्टेशनला बुधवार पेठ मेट्रो स्टेशन म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. तसेच या परिसराला परिचित नसणारी व्यक्ती मेट्रोतून प्रवास करताना बुधवार पेठ मेट्रो स्टेशन म्हणून उतरेल; मात्र ती बुधवार पेठ असणारच नाही.

तसेच कसबा पेठेत जागणाऱ्या प्रवाशाला कसबा पेठ मेट्रो स्टेशन मिळणारच (Pune Metro) नाही, असा गोंधळही यातून निर्माण होऊ शकतो. यासाठीच कसबा पेठेतील मेट्रो स्टेशनचे नामकरण कसबा पेठ असेच करावे, असेही ढोले आणि भांड यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.