Theur : सात हजारांची लाच घेणाऱ्या  थेऊरच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  सातबाऱ्यावरील नावे कमी करण्यासाठी सात हजारांची ( Theur ) लाच घेत असताना थेऊर येथील महिला मंडल अधिकाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मंगळवारी (दि.12) थेऊर मंडल कार्यालय येथे करण्यात आली आहे.

 

जयश्री कवडे असे अटक महिला मंडल अधिकाऱ्यांचे नाव आहे. कवडे यांच्यासह योगेश कांताराम तातळे हा खासगी संगणक ऑपरेटर तसेच खासगी इसम विजय सुदाम नाईकनवरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

Pune Metro : पुणे मेट्रोच्या सात स्थानकांना हरित स्थानकांचे मानांकन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आजीच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरून काही नावे कमी करायची होती. त्यासाठी तक्रारदारांनी तलाठी यांना अर्ज केला होता. त्यानुसार   तलाठी यांनी तसे आदेश मंडल अधिकारी कार्यालयाला पाठवले होते. त्यानुसार तक्रारदार जयश्री कवडे यांना भेटायला गेला. यावेळी कवडे यांनी विजय नाईकनवरे यांना भेटायला सांगितले. यावेळी त्याने तक्रारदार यांच्याकडे  10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.  तडजोडी अंती 7 हजार रुपये रकम ठरली.

 

यावेळी मंगळवारी 7 हजार रुपयांची लाच घेताना नाईकनवरे याला अटक केली तर कवडे व तातळे यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून तिघां वर ही  लोणी काळभोर पीलस ठाणे येथे गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधिक्षक माधुरी भोसले या करत ( Theur ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.