Charholi : चऱ्होलीत पाच वाहनांची तोडफोड; दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  चऱ्होली येथे तिघांनी मिळून पाच वाहनांची तोडफोड ( Charholi ) केली. तसेच एका वाहन चालकाला मारहाण करून गाडीतून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 27) मध्यरात्री घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ओंकार युवराज लांडे (वय 21), सुरज अंकुश पाटोळे (वय 22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बाबू शहा (वय 23, सर्व रा. चऱ्होली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारुती दत्तात्रय राऊत (वय 47, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करारनामा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत हे त्यांच्या घरी असताना आरोपी त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी हातोडी, दगड घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने राऊत यांच्या कारची काच फोडून गाडीतून 1100 रुपये जबरदस्तीने चोरून घेतले. त्यानंतर परिसरातील अन्य चार वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. दिघी पोलीस तपास करीत ( Charholi ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.