Mumbai Loksabha 2024 : सिनेअभिनेता गोविंदाचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; उद्धव ठाकरे गटाविरोधात शिंदे यांची नवी खेळी?

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात (Mumbai Loksabha 2024 ) आता सिनेअभिनेत्यांची एंट्री झाली असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण या कलाकारांनी महायुतीत तेही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास पसंती दिली आहे. मुंबईचा 90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा हा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवस सुरू होत्या. आज त्याने शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जागा त्याला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर करीना आणि करिश्मा कपूर या दोन अभिनेत्री शिवसेनेच्या स्टार प्रचारक असणार आहेत. 

आज सकाळी ‘महायुती’ने जागा वाटपाची घोषणा करण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान, आज एकनाथ शिंदें यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत गोविंदाचा पक्षप्रवेश झाला.  तत्पूर्वी, एकनाथ शिंदे यांचे सेनानेते कृष्णा हेगडे यांनी अभिनेता गोविंदाची मुंबईतील जुहू येथील घरी भेट घेतली होती.

Pune : ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करारनामा

अमोल कीर्तिकर विरोधी उमेदवार?

राजकीय जाणकारांच्या मते, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून रिंगणात उतरलेल्या अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात अभिनेता गोविंदाला मैदानात उतरवण्याचा एकनाथ शिंदे गटाचा गेम प्लॅन आहे. अमोल कीर्तिकर हे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असले तरी गजानन कीर्तिकर मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले आहेत. तथापि, त्यांच्या वडिलांना निवडणूक लढवण्यात रस नाही कारण त्यांना त्यांच्या (Mumbai Loksabha 2024 ) मुलाच्या विरोधात उभे राहायचे नाही. म्हणून अमोल यांना पराभूत करण्यासाठी गोविंदाला  रिंगणात उतरवणार का? ही चर्चा सुरू झाली आहे.

मला कोणतेही निवडणुकीचे तिकीट नको

परंतु, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत गोविंदाचे स्वागत करताना म्हंटले आहे, की ते स्टार प्रचारक म्हणून काम करतील. मला कोणतेही निवडणुकीचे तिकीट नको आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तर पक्ष प्रवेशानंतर गोविंदा याने आपल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे, की  मी आदरणीय एकनाथ शिंदेंचे आभार मानतो. आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे, ही देवाचीच मिळालेली कृपा आहे. मी 2004 ते 2009 या काळात सक्रीय राजकारणात होतो. त्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला वाटलं होतं की पुन्हा कधीच  राजकारणात येणार नाही. पण 2010 ते 2024 या 14 वर्षाच्या वनवासानंतर रामराज्य ज्या पक्षात आहे, तिथेच त्याच पक्षात एकनाथ शिंदेंच्या कृपेने या पक्षात आलोय. मी त्यांचे आभार मानतो.

तथापि, अद्याप काहीही अधिकृत केले गेले नसले तरी गोविंदाचा राजकीय इतिहास पाहता  2004 मध्ये गोविंदाने विद्यमान खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा धक्कादायक पराभव केला होता. जर गोविंदा उमेदवार नसेल तर मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात तिकीट कोणाला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.