PCMC : सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – कार्यालयीन कामकाजात कार्यरत (PCMC) असताना उत्साहाने, प्रामाणिकपणे केलेल्या कामांचे कर्मचा-यांस समाधान लाभते, तोच सेवेतील खरा आनंद असतो असे सांगून सर्व सेवानिवृत्तांनी पुढील आयुष्य आपले आरोग्य संभाळून, आनंदाने जगावे असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे मार्च 2024 अखेर अधिकारी, कर्मचारी अशा एकूण 23 जणांचा सेवानिवृत्ती निमित्त सह आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी संदीप वडके, चारूशीला जोशी, कर्मचारी महासंघाचे नथा मातेरे, सुप्रिया जाधव आदी उपस्थित होते.

Mumbai Loksabha 2024 : सिनेअभिनेता गोविंदाचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; उद्धव ठाकरे गटाविरोधात शिंदे यांची नवी खेळी?

आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता संजय तुपसाखरे, उपअभियंता राजेंद्र इंगळे, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, लेखाधिकारी शरद रहाणे, कनिष्ठ अभियंता अब्दुलहमीद मोमीन, उपलेखापाल दत्तात्रय आचारी, मुख्याध्यापक रूक्साना मोमीन, स्वाती निकम, सविता वाव्हळ, सिस्टर इनचार्ज अरूणा धनराज, लॅब टेक्निशियन ज्ञानोबा वाघमारे, फार्मासिस्ट रामचंद्र लाड, उपशिक्षिका शामला राहींज, सुरक्षा सुपरवायझर सुरेश भोईर, मुकादम रामू जगताप, दिपक वारे,नंदकिशोर भालेराव, प्लंबर वसंत गावडे, रखवालदार (PCMC) मनोहर येनपुरे, मजूर काळूराम भालके, दिलीप काळजे यांचा समावेश होता.

तर स्टाफनर्स शैला जाधव, मजूर बबन उगले यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.