Pune : निर्माल्याचे होणार खत ; 676 टन निर्माल्य संकलित

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवाच्या दहा दिवसात महापालिका प्रशासनाकडून शहरातील 210 विसर्जन ठिकाणी तब्बल 673 टन निर्माल्य संकलन केल आहे. त्यात 579 टन निर्माल्य महापालिकेने तर 97 टन निर्माल्य स्वच्छ संस्थेच्या मदतीने संकलित केले आहे. या निर्माल्याचे खत केले जाणार असून महापालिका उद्यानासाठी वापरण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

भाविकांनी तसेच गणेश मंडळांनी निर्माल्य नदीत न टाकता नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलश यामध्ये टाकावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील गणेश मंडळे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडून हा उपक्रम राबविला जात आहे, त्याला प्रतिसाद देत भाविकांकडून निर्माल्य नदीमध्ये न टाकता पालिकेच्या वतीने विसर्जनाच्या 43 ठिकाणी कलश तर 160 निर्माल्य कंटेनर ठेवण्यात आले होते. या शिवाय, स्वयंसेवी संस्था तसेच पालिका कर्मचाऱ्यांकडून जनजागृती केली होती त्यामुळे 676 टन निर्माल्य संकलित झाल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.