Chinchwad : अण्णासाहेब पाटील यांची 85 वी जयंती साजरी

एमपीसी न्यूज- कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आण्णासाहेब पाटील यांची आज, मंगळवारी 85 वी जयंती साजरी करण्यात आली. चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद तसेच कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, मारुती कौदरे, भिवाजी वाटेकर, संदीप मधुरे, नागेश वनवटे, बाळासाहेब शिंदे, विजय खंडागळे, प्रल्हाद खेडकर, आनंद हिंगे, अंकुश सोनसाळे, पांडुरंग काळोखे, शिवाजी घोटेकर, मुरली कदम, खंडू गवळी, किसन बावकर, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, गोरक्ष बांगर, सतीश कंठाळे, शंकर मदने, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे, ज्ञानदेव पाचपुते, सापते, अशोक साळुंके, जोगिंदर शर्मा, ओंकार माने, समर्थ नाईकवाडे, ज्ञानोबा मुजुमले, श्रीकांत मोरे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, मालवाहू माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकवले. पाटण तालुक्यातील मंद्रुळ-कोळे या गावी जन्मलेल्या अण्णासाहेबांनी आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर उसाच्या चरकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. तेथून त्यांनी दारुखाना परिसरात अनेक ठिकाणी ओझे वाहण्याची कामे केली. ही कामे करीत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, त्याची मालकांकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळायचे. या तळमळीतूनच त्यांनी माथाडी कामगारांच्या चळवळीचा लढा सुरू केला. अनेक राजकीय नेत्यांकडे नेत्यांकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा अंमलात आणला, आज माथाडी संघटना एक बलाढय़ संघटना म्हणून ओळखली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.