Pimple Saudagar : उन्न”ती”च्या गणपतीचे विसर्जन 

एमपीसी न्यूज – गणपती बाप्प्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा  जयघोष करीत, ढोल ताशेच्या गजरात लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अगदी पारंपारिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली. उन्नतीचा हा गणपती फक्त महिलांसाठी असल्याने या मिरवणुकीत सर्व महिलावर्गच सामील झाला होता .

विविध रंगाच्या रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीत लाडक्या बाप्पाला बसवून महिलांनी बाप्पाची मिरवणूक काढली होती, त्याचबरोबर या विसर्जन मिरवणुकीत खास महिला ढोल पथक सामील झाले होते. त्याचबरोबर उन्नतीच्या सर्वच महिला सदस्यांनी अगदी पारंपारिक पद्धतीने पेहराव करून मिरवणुकीत सामील झाल्या होत्या त्यामुळे हि मिरवणूक परिसरात एक आपला वेगळेपणा उमठून गेली.

पिंपळे सौदागर परिसरात उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने ती चा गणपती हि संकल्पना पहिल्यांदाच राबविली , या उत्सव काळात समाजाती विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व वंचित घटकातील  महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच मिरवणुकीत सुद्धा महिलांनीच सहभाग घेत अगदी जल्लोषात बाप्पाची मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.