Pimpri : संस्कार प्रतिष्ठान कडून जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करुन साजरा केला

एमपीसी न्यूज : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.५ जुन २०२३ रोजी  मोजे मेदनकरवाडी येथील वनजमिनीवरील रिकाम्या जागेत वनपरिक्षेत्र चाकण वनविभाग चाकण, संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी (Pimpri) चिंचवड शहर व विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ४० प्रजातीच्या ५००० रोपांची लागवड करण्यात आली.

Pimpri : पिंपरी न्यायालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

या जातींवर संशोधन करण्यात येत आहे. काही दिवसातच चाकण परिसरातील शेतकऱ्यांना वृक्ष लागवटीचे महत्त्व समजेल. संबंधित शेतकऱ्यांना या लागवटीचा फायदा होणार आहे. असे योगेश महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी राजगुरुनगर स्थित चाकण, एम यु जाधवर वनपरिमंडळ अधिकारी चाकण यांनी सांगितले आहे. सदरची लागवड योगिता नायकवडी (वीर) वन परिमंडळ अधिकारी चाकण, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याचबरोबर कडूनिंब, वड, पिंपळ, हिरडा, आंबा, चिंच, या जातीच्या वृक्षांच्या जातींचे वृक्षारोपण करण्यात आले. आज एकूण ५००० झाडांचे वृक्षारोपण केले. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.  मोहन गायकवाड यांच्या हस्ते रोपांचे पुजन झाले.   सहभागी झालेल्या सभासदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठानचे प्रविण भामरे, सुनिता सपाटे, सातपुते उपवनरक्षक जुन्नर,  सहा.उपवनरक्षक संदेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी वाय एस महाजन , वनपरिमंडळ अधिकारी चाकण एस यु जाधवर , वनरक्षक ए ए गवळी , रेश्मा गायकवाड, श्री आरोडे, श्री आगरकर, श्रीमती रावते, श्री पाटोळे, श्री पोत्रे, श्रीमती जगताप, श्रीमती उबाळे, श्री देवानंद सैद यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.