Pune : सारथी फाउंडेशनतर्फे तळजाईवर वृक्षारोपण; पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

एमपीसी न्यूज – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, (Pune)तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सारथी फाउंडेशनतर्फे तळजाई पठार येथे वृक्षारोपण करण्यात आले.

विविध प्रकारच्या 500 देशी झाडांची लागवड करण्यात आली. तसेच (Pune)काशीबाई नवले हॉस्पिटलच्या सहकार्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, सहकारनगर व कात्रज पोलीस चौकीमधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजिले होते.

पुणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे, भारत विकास परिषदेच्या सचिव सुषमा कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रुपेश संत, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक पोलीस निरीक्षक छब्बू बेरड, सारथी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिल सुरवसे-पाटील उपाध्यक्ष दीपक चौगुले, विश्वस्त अमीना भोसले, प्रिया दामले, राहुल नाईक, विलास भोसले, अभी कावरे, मयूर भाडाळे, सुरज धुमाळ, पवन दुर्वे, बंटी जाधव,तानाजी मोहिते, सुधीर बोंद्रे आदी उपस्थित होते.

Pimpri : राष्ट्र उभारणीसाठी ज्येष्ठांचे योगदान मोलाचे! – सुरेश साखवळकर

 


आरोग्य शिबिराला नवले हॉस्पिटलचे डॉक्टर मुकुंद जाधव व सर्व स्टाफ, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, राहुल नाईक, सुषमा कोंडे, अमीना भोसले, उमेश महाडिक, अरविंद निनारिया आदी उपस्थित होते.

सुरेखा भणगे म्हणाल्या, “प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. झाडे लावून पर्यावरण संरक्षणात योगदान देणाऱ्या सारथी फाउंडेशनचे, तसेच सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा करणाऱ्या रोहन सुरवसे पाटील यांचे अभिनंदन करते.”

रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “वाढदिवसानिमित्त होणार अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर नेहमीच भर देतो. आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झालेली असून, जास्तीत झाडे लावण्यावर आणि ती जगण्यावर आपण सर्वानी एकत्रिपणे काम करायला हवे. अनिल सुरवसे, दीपक चौगुले यांनी पुढाकार घेत हा उपक्रम आयोजिला याबद्दल आभार मानतो.”

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.