Pune : पुण्यात झोपण्यावरून झालेल्या वादातून तरुणाला पेटवून दिले; भर वस्तीत घडला प्रकार

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत झोपण्यावरून झालेल्या वादा नंतर एका तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून देणे त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी मध्यरात्री शनिवार पेठेतील मुखेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाचनालयात हा संपूर्ण प्रकार घडला.

मिलिंद सिद्धपा होसकुटी (वय ३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) असे या घटनेत भाजलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी बालमुकुंद पंडीत (वय ५९, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी रात्री फिर्यादी यांना झोपण्यासाठी उशीर झाल्याने ते मुठेश्वर मंदिरात झोपण्यासाठी आले होते. यावेळी त्या ठिकाणी जागेवरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भांडण झाले. भांडण झाल्यानंतर आरोपी पंडित याने फिर्यादीला शिगा करत मारण्याची धमकी दिली.
दरम्यान या घटनेनंतर फिर्यादी हे बाजूलाच असलेल्या वाचनालयात जाऊन झोपले. फिर्यादी गाड झोप येत असताना आरोपीने त्या ठिकाणी येऊन फिर्यादीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावली. या घटनेत फिर्यादी भाजले आहेत. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पंडित याला अटक केली आहे. पंडित याने त्यांच्या अंगावर कोणता ज्वलनशील पदार्थ टाकला, याची माहिती देत नसून सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.
https://youtu.be/s3EZk1wzMiw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.