Pune : पुण्यात ताड़ी तयार करण्यासाठी लागणाऱ्या केमिकलचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज –  ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेट केमिकलचा ( Pune) कारखाना पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संगमनेर मध्ये जाऊन ही कारवाई केली  आहे.

LokSabha Elections 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्धवस्त केला असून तेथून ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे   2300 किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल ) जप्त करण्यात आलंय. या केमिकल ची किंमत 60 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

क्लोरल हायड्रेट केमिकलपासून तयार केलेली ताडी पिल्याने आरोग्याच्या अती – गंभीर समस्या निर्माण होतात. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होवू ( Pune) शकतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.