LokSabha Elections 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

एमपीसी न्यूज –  शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ( LokSabha Elections 2024 ) अखेर आज आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये 17 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही यादी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

LokSabha Elections 2024 : मावळमधून ठाकरे गटाची संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर

‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.. ….मुंबई दक्षिण मध्य: श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ, वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, रायगड अनंत गिते, सिंधुदुर्ग, रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल किर्तीकर, परभणी संजय जाधव’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं ( LokSabha Elections 2024 ) आहे.

 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अद्यापही चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्यावतीने मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.