Chakan : आदिवासी बांधवांच्या जमिनीचा गैरवापर; अखेर मेदनकरवाडी हद्दीत वनविभागानेच केली अतिक्रमणांवर कारवाई

एमपीसी न्यूज : वनविभागाने कारवाई करून काही भंगाराची (Chakan) दुकाने पोलीस बंदोबस्तात काढून टाकली आहे. चाकण -आळंदी मार्गावरील मेदनकरवाडी (ता. खेड,जि.पुणे) हद्दीतील वनविभागाच्या हद्दीत सदरची अतिक्रमणे करण्यात आली होती. वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले कि, सदरची जमीन आदिवासी ठाकर बांधवाना शेतीसाठी शासनाने दिलेली होती. मात्र सदरच्या आदिवासी बांधवाना दिलेल्या जमिनीचा वापर काही भंगार व्यावसायिक बेकायदेशीरपणे करत होते. वनविभागाने अखेर या मंडळींवर कारवाई करून सदरची अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली आहेत.

चाकण जवळील मेदनकरवाडी येथील गट नं. 242 मधील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 हेक्टर क्षेत्र वाटप करण्यात आले होते. परंतु, सदरील क्षेत्र हे फक्त शेती प्रयोजनासाठी शासनाने वाटप केलेले होते . सदर क्षेत्रात शेती व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यावसायिक कामासाठी सदर व्यक्ती वाटप केलेले क्षेत्राचा उपयोग करू शकत नाहीत. सदर क्षेत्रातील (Chakan) असलेले पुर्वीचे पक्के बांधकाम खोल्या, वीटभट्टी, व्यावसाईक दृष्टीने उभारलेले तीन ते चार पत्र्याचे शेड, भंगाराचे दुकान, हॉटेलचे पक्के बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.

Maval : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात कान्हे जिल्हा परिषद शाळा प्रथम

सदरील आदिवासी ठाकर कुटुंबाना वाटप केलेल्या क्षेत्रातील वरील अनाधिकृत अतिक्रमण काढण्याची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चाकण यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.