Pimpri : पिंपरी न्यायालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) न्यायालयाच्या नेहरूनगर येथील नवीन इमारतीमध्ये 350 वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Chakan : सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे यांचा जाहीर नागरी सत्कार

ॲड. अतिश लांडगे, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. निखिल बोडके, ॲड. उमेश खंदारे, ॲड. मंगेश खराबे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची भव्य प्रतिमा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनला भेट देण्यात आली. याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमान राजकारभाराचे स्मरण करण्याचा सुवर्णसोहळा. रयतेचे हित लक्षात घेऊन शासन करण्याचा आदर्श परिपाठ महाराजांचे चरित्र आपल्याला देते. राज्याभिषेक दिनानिमित्त हाच आदर्श डोळ्यांपुढे ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी वाटचाल सुरू ठेवूया असे प्रतिपादन वकील वर्गाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.