Pune : फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी केल्या जैवविविधता नोंदी

एमपीसी न्यूज – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी (Pune)वेल्हे तालुक्यातील गुंजवणे आणि साखर या गावातील ग्रामस्थांच्या सहायाने जैवविविधता नोंदी केल्या. डीईएस पुणे विद्यापीठ, सृष्टी कंजर्वेशन फाउंडेशन आणि रेनट्री यांचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांनी 6 दिवसांचे वर्ग आणि 9 दिवसांच्या प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेत सहभाग घेतला. गावांतील जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाच्या विविध पैलूंचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.

 

Pune : 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत पुण्यात रंगणार राज्यस्तरीय सेना केसरी कुस्त्यांचा फड, पार पडणार भव्य कुस्त्यांचे सामने

या अंतर्गत कृषी जैवविविधता, वन्यजीव जैवविविधता, (Pune)लोकदृश्ये आणि जैवविविधतेसंबंधित पारंपरिक आणि सांस्कृतिक ज्ञान यांचा समावेश होता.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची, स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि व्यवस्थापन आणि जैवविविधतेवर लोकांची निर्भरता समजून घेण्याची संधी मिळाली. प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, रेनट्रीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमिता दांडेकर, सृष्टी फाउंडेशनचे डॉ. गिरीश जठार, डॉ. राहुल मुंगीकर यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापिका पूनम देशपांडे, डॉ. रुपाली गायकवाड आणि केतकी वैद्य यांनी संयोजन केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.