Panshet dam : पानशेत धरणातून 550 क्युसेक विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज : पानशेत धरणातून काल रात्री 11 वा विद्युत निर्मिती केंद्रा द्वारे 550 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(Panshet dam) अशी माहिती यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

Kalapini Ganeshotsav : हर्षोल्हासात साजरा झाला कलापिनी चा कलागणेशोत्सव….

पानशेत धरण 100 टक्के भरले आहे. पुणे जिल्हयात काल मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे धरणातून 550 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे. आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे.(Panshet dam) या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.