Kalapini Ganeshotsav : हर्षोल्हासात साजरा झाला कलापिनी चा कलागणेशोत्सव….

एमपीसी न्यूज : कलापिनीतील श्री कलागणेशाची स्थापना सर्व स्वास्थ्य योगीसभासदांनी अतिशय उत्साहात,आनंदात आणि भक्तिपूर्ण वातावरणात केली.(Kalapini Ganeshotsav) गेली 20 वर्षे कलापिनी तर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी उद्योग धाम येथे  विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले जातात. ह्या वर्षी सुद्धा हे सातत्य राखले गेले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही कलापिनीच्या वतीने श्री कलागणेशाची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला . रोज सकाळी आरती अगदी वेळेवर होईल ह्याची उत्तम व्यवस्था श्री.बकरे आणि श्री. व सौ.पांढरे यांच्या मार्गर्शनाखाली खाली उत्तम ठेवली होती.

कार्यक्रमाची सुरवात सौ. लीना परगी यांनी श्री गणेशाच्या गाण्यांनी केली नंतर कुमार भवनच्या मुलांनी सुंदर नाटक आणि नृत्य सादर केले तसेच कलापिनी निर्मित श्री.मनोज काटदरे दिग्दर्शित धम्माल विनोदी एकांकिका “फसला माधव दोन्ही कडे” चा शुभारंभाचा प्रयोग पण सादर करण्यात आला.(Kalapini Ganeshotsav) तेव्हा उद्योग धामच्या मुलांनी खूप छान नृत्य,नाट्य छटा सादर केल्या. उद्योग धाम तर्फे नाटकातील छोट्या मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या.

Nana Patekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नाना पाटेकर झाले स्वयंपाकी, तयार केला हा पदार्थ

कलापिनी कलागणेशा समोर रोज कलापिनीतील कलाकारांनी आपली कला सादर करून आशीर्वाद घेतले. बाल भवन, कुमार भवन, महिला मंच, स्वास्थ्य योग, सृजन नृत्यालय (Kalapini Ganeshotsav) यातील सर्व कलाकारांनी श्री कला गणेशाला….कलेच्या देवतेला मानवंदना दिली. ह्या वर्षी पासून कलापिनीमध्ये सर्व कलाकारांच्या सादरीकरणाचा नवा उपक्रम सुरू केला आहे. त्याला कलापिनीच्या सर्व विभागांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे..आणि स्वागतही झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.