Nana Patekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नाना पाटेकर झाले स्वयंपाकी, तयार केला हा पदार्थ

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुणे शहरातील गणेश मंडळांना भेटी देत गणेश दर्शन केले. त्यानंतर शेवटी त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नाना पाटेकर मुख्यमंत्र्यांसाठी स्वतः स्वयंपाक झाली होते.(Nana Patekar) नाना पाटेकर यांनी स्वतःच्या हाताने चुलीवर पिठलं करून मुख्यमंत्र्यांना खाऊ घातले. नाना पाटेकर यांच्या सिंहगड पायथ्याला असलेल्या डोणजे गावात ही सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकाळपासून जेवणच केलं नव्हते. मात्र नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊस वर त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. (Nana patekar) नाना पाटेकर यांनी स्वतः चुलीवर पिठलं केलं. सोबतच त्यांच्या शेतातील केळीचे शिकरण, भाकरी पालेभाज्या, वरणभात असा जेवनाचा भेत होता. यावेळी नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांनी सर्वांना आग्रहाने पोटभर जेऊ घातले.

MPC News Podcast 8 September 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, (Nana Patekar) जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि इतर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊस च्या आवारात रामफळाचे झाड लावण्यात आले. तर मुख्यमंत्र्यांनीही यावेळी बोलत असताना निसर्गाच्या सानिध्यात राहत असणाऱ्या नाना पाटेकर यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.