Pune : पुणे जिल्ह्यात निवडणूक आयोग राबविणार गृहनिर्माण सोसायट्यांतर्गत मतदार नोंदणी अभियान

एमपीसी न्यूज – निवडणूक आयोगाने पुणे जिल्हा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा (Pune) पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार 21 जुलै ते 21 ऑगस्ट या महिनाभराच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात निवडणूक आयोग राबविणार गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान राबविले जाणार आहे.

Pune : फ्लेक्स काढण्यासाठी विजखांबावर चढल्याने वीजेचा धक्का बसून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

नोंदणीकृत सोसायटीमधील 100 टक्के मतदार नोंदणी हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या कालावधीत अर्ज करत त्यांच्या मतदार यादीतील दुरुस्ती किंवा नोंदणी करण्यात येणार आहे.

यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एक परिपत्रक जाहीर केले असून त्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.5 जानेवारी 2023 च्य़ा मतदार यादीनुसार पुण्याच्या जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदारांची नोंद आहे.

यंदा मात्र गृहनिर्माण सोसायटी स्तरावरच हे अभियान राबवले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात एकूण 2 हजार 936 इतक्या नोंदणीकृत सोसायटी आहेत.

मतदारांचा टक्का येत्या 2024 च्या  निवडणूकीत वाढावा हे यामागचे उद्दिष्ट आहे.यासाठी 22 व 23 जुलै रोजी आयोगाचे अधिकारी किंवा कर्मचारी सर्व नोंदणीकृत सोसायटींना भेटी देणार आहेत व अभियानाचे आयोजन करणार आहेत.

यामध्ये मतदार यादीत नव्याने नाव नोंदवणे, नाव वगळणे, मतदाराचा रहिवास बदल, पत्ते व नाव दुरुस्ती, वय़ चुकीचे छापले किंवा इतर काही बाबी असतील तर तशी दुरुस्ती करण्यात येते.

कसा करावा अर्ज  व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालील प्रमाणे

1) नव्याने नाव नोंदवायचे असेल तर – नमुना अर्ज 6 – रहिवासी पुरावा (लाईट बील, पाणी पट्टी, आधारकार्ड,बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक,पासपोर्ट, नोंदणीकृत भाडेकरार किंवा विक्रीखत) वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला, आधारकार्ड, 10 वी किंवा 12 वी चे अधिकृत प्रमाणपत्र.

2) मतदार यादीतील नाव वगळायचे असेल तर नमुना अर्ज 7 – नाव वगळायचे आहे अशा व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, लाईट बील, पाणी किंवा घर पट्टी, आधारकार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक,पासपोर्ट, नोंदणीकृत भाडेकरार किंवा विक्रीखत.

3)    मतदान कार्डातील दुरुस्ती- नमुना अर्ज 8 – पत्त्याचा पुरावा (लाईट बील, पाणी किंवा घर पट्टी, आधारकार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पासबुक,पासपोर्ट, नोंदणीकृत भाडेकरार किंवा विक्रीखत), वय बदलासाठी जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला, आधारकार्ड, 10 वी किंवा 12 वी चे अधिकृत प्रमाणपत्र) किंवा पासपोर्ट

कसे व कधी राबवले जाईल अभियान –

1)    यासाठी 17 ते 21 जुलै दरम्यान निवडणूक आयोगाचे कर्मचारी भेट देतील व त्यांना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन त्यांची जुळवाजुळव करण्यास सांगतील.

2)    22 जुलै ते 23 जुलै रोजी अभियानाचे सोसायटीमध्ये आयोजन केले जाईल.

3)    24 जुलै रोजी नोडल अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सुचनानुसार माहिती घेऊन ती कार्यालयात सादर कऱण्यात येईल.

अशा प्रकार तीन दिवसात हे अभियान राबविले जाणर आहे.

सोसायटी चेअरमन असेल मध्यस्थ –

या अभियानात सोसायटी चेअरमन हा दुवा असेल जो निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सोसायटीतील मतदारांची माहिती व कागदपत्र पुरवेल तसेच 100 टक्के मतदार नोंदणी झाली आहे याची खात्री करून घेईल.

ऑनलाईनही दुरुस्ती व अर्ज करणे शक्य –

अभियानादिवशी तुम्ही तेथे हजर नसाल किंवा तुमच्या सोसायटीमध्ये अभियान झालेच नाही तरी देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपली नाव नोंदणी किंवा दुरुस्ती करु शकता.

त्यासाठी तुम्हाला http://votes.eci.gov.in     या बेवसाईटला भेट देऊ शकता किंवा Voter Search app या मोबाईल अ‍ॅपवरून आपले नाव कोणत्या यादीत आहे किंवा नाही हे तपासू (Pune)  शकता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.